Home महाराष्ट्र ज्याला कावीळ झालाय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं; शंभुराज देसाईंचा गोपीचंद पडळकरांवर...

ज्याला कावीळ झालाय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं; शंभुराज देसाईंचा गोपीचंद पडळकरांवर टीका

सातारा : ज्याला कावीळ झालाय, त्याला सर्व जग पिवळंच दिसतं, असं म्हणत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. ज्याला कावीळ झालाय त्याला सर्व जग पिवळंच दिसत या म्हणीप्रमाणे पडळकरांना या सरकारने कितीही चांगले निर्णय घेतले तरी त्यात खोटच दिसते, असं म्हणत शंभूराज देसाईंनी पडळकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, राज्य सरकार साडेपाच हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील जनतेसाठी देतीय. तुम्ही केंद्रातून किती मदत देताय? गोपीचंद पडळकरांना चांगल काम दिसत नाही, असा हल्लाबोलही शंभूराज देसाईंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबईची बॅटिंग चालू आहे, मुद्द्याच बोला; मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह चालू असताना चाहत्याची विनोदी प्रतिक्रिया

“CBSE Board Exam! दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे”

आता ‘या’ शहरात रात्री बाहेर पडलात तर होणार Corona चाचणी! पहा व्हिडिओ

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा; मोदींना पत्र लिहून केल्या ‘या’ प्रमुख मागण्या