Home क्रीडा मुंबईची बॅटिंग चालू आहे, मुद्द्याच बोला; मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह चालू असताना चाहत्याची विनोदी...

मुंबईची बॅटिंग चालू आहे, मुद्द्याच बोला; मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह चालू असताना चाहत्याची विनोदी प्रतिक्रिया

भारताला क्रिकेटवेड्यांचा देश का म्हटलं जातंय, याचा प्रत्यय अनेक घटनांमधून येत असतो. अशीच एक गमतीशीर घटना मंगळवारी घडली.

मंगळवारी चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2021 चा पाचवा सामना चालू होता. मुंबई इंडियन्स फलंदाजीसाठी मैदानावर उतरले होते. त्यांचा डाव चालू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह आले होते.

महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यादरम्यान महाराष्ट्रातील लॉकडाऊन कसा असेल, जनतेवर कोणती बंदने असतील, अशाच बऱ्याच मुद्द्यांसंदर्भात सविस्तर माहिती दिली

मुख्यमंत्री ठाकरे लाईव्ह बोलत असताना मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने अतिशय अनोखी प्रतिक्रिया दिली. ‘मुंबई इंडियन्सची फलंदाजी चालू आहे. थेट मुद्द्यावर या,’ अशी विनोदी प्रतिक्रिया त्या अज्ञात चाहत्याने दिली. त्या चाहत्याचे नाव कारिया हिरेन असे आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने त्या चाहत्याच्या गमतीशीर प्रतिक्रियेचा स्क्रिनशॉट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सेहवागने शेअर केलेल्या या मजेशीर पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag)

महत्वाच्या घडामोडी –

“CBSE Board Exam! दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे”

आता ‘या’ शहरात रात्री बाहेर पडलात तर होणार Corona चाचणी! पहा व्हिडिओ

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा; मोदींना पत्र लिहून केल्या ‘या’ प्रमुख मागण्या

“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण”