Home अमरावती अंधेरी पूर्व निवडणूकीत वंचितचा पाठिंबा कुणाला?; शिवसेना की भाजप?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच...

अंधेरी पूर्व निवडणूकीत वंचितचा पाठिंबा कुणाला?; शिवसेना की भाजप?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

414

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

यवतमाळ : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. यानंतर शिवसेनेत 2 गट झाले आहेत. एक गट ठाकरेंचा तर दुसरा शिंदेंचा. अशातच आता पहिल्यांदाच अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक होणार आहे.

अशातच ठाकरे गटाला काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींनी पाठिंबा दिला. तर वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर आता वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : “सुषमा अंधारेंनंतर आणखी एक आंबेडकर चळवळीचा नेता ठाकरे गटात; मातोश्रीवर हाती बांधलं शिववंधन”

आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलं. ते यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, शिवसेनेच्या कोणत्याही गटाबाबत मी सकारात्मक नाही. मात्र, व्यवस्थेचा विचार केला, तर माझ्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने, जे चुकीचं सुरू होतं, त्याबाबत मी माझी भूमिका मांडली. त्यात मी कायद्याची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिला, तर काय होऊ शकतं, याची सर्वोच्च न्यायालयानेच मांडलेली जंत्री मी लोकांसमोर मांडली, असं मत प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा

अजिबात घाबरू नकोस, वडिलांसारखा लढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना दिला धीर

एवढी संपत्ती कुठून आली?; छगन भुजबळांनी ठाकरे-पवारांसमोरच दिलं उत्तर, म्हणाले…