Home महाराष्ट्र एवढी संपत्ती कुठून आली?; छगन भुजबळांनी ठाकरे-पवारांसमोरच दिलं उत्तर, म्हणाले…

एवढी संपत्ती कुठून आली?; छगन भुजबळांनी ठाकरे-पवारांसमोरच दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना भुजबळांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराबाबतही भाष्य केलं. लोक म्हणतात, एवढी संपत्ती कशी, पण आम्ही दोन भावांनी खूप मेहनत घेतली. सकाळी 3 वाजता भाजी घ्यायला मार्केटमध्ये जायचो. ती भाजी माझगावच्या घरासमोरच्या फुटपाथवर विकायची. नंतर मोठ्या कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट घेतली आणि ट्रकभर भाजी पाठवायचो., असं भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा : मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर मोठं विधान, म्हणाले…

माथाड्यांची कॉन्ट्रॅक्ट घेतली त्यात दोन पैसे मिळाले. एक कंपनी बंद पडली होती, तेव्हा कामगारांनी मलाच कंपनी चालवा आणि पगार द्या असं सांगितलं. अख्ख्या बीएसटीचे टायर माझ्याकडे रिमोल्डिंगला यायचे. रबरची दुसरी कंपनी पनवेलला घेतली. मुंबई-गोवा पहिली लक्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स सुरू केली. सिनेमे काढले, अनेक उद्योग सुरू होते, असं भुजबळांनी यावेळी सांगितलं.

माझं नाव तेलगी स्टॅम्प केसमध्ये घेतलं गेलं. मोका लावला, क्लीन चिट दिली, पण जे नुकसान व्हायचं ते झालं. उपमुख्यमंत्रीपद गेलं, मंत्रिपदही गेलं. साहेब म्हणाले निवडणूक लढणार का? हो म्हटलो,’  असाही किस्साही भुजबळांनी यावेळी सांगितला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल

…तो पर्यंत उद्धव आणि शिवसैनिक तुझी मुलं, काळजी घे; खासदार संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

“महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, सर्व ठाकरेंनी, आता तरी एकत्र यायला हवं”