Home महाराष्ट्र आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?- अतुल भातखळकर

आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?- अतुल भातखळकर

मुंबई : शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीस दिलं जाईल, असं सकपाळ यांनी सांगितलं. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेवर टीका केली तर उत्तर द्यायला शिवसेना नेते नसले तरी काँग्रेसवाले तात्काळ हजर असतात. भ्रष्टाचाराबाबत दोन्ही पक्ष एकमेकाला वरताण आहेत, फरक फक्त भगव्यामुळे होता. आता शिवसेनेने भगवा गुंडाळल्यानंतर शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे???, असं ट्विट करत अतुल भातखळकरांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर”

थोरातांचे वक्तव्य म्हणजे आहेराचं पाकिट नसतानाही जेवणाच्या आशेने चोरून लग्नात जाण्यासारखं- अतुल भातखळकर

“अभिनेत्री विद्या बालनने डिनरसाठी नकार दिल्याने ‘या’ मंत्र्याने थांबवलं सिनेमाचं चित्रीकरण”