Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात…

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात…

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भाजपात दिसले असते”, असं वक्तव्य भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. याच मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलंय. आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

जयंत पाटील खरंच भाजपामध्ये येणार आहेत का? असा प्रश्न विचारला असता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सूचक उत्तर दिलं. मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता नसती तर जयंत पाटील भाजपात येणार होते. त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चादेखील झाली होती. जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे, ती मी तिथेच जाऊन उघड करणार आहे. पुढचं सरकार आमचंच येणार असं जयंत पाटील सातत्याने म्हणत आहेत. कदाचित पुढील सरकारमध्येही मी मंत्री असेन असं त्यांना म्हणायचं असेल, असं राणे म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर”

थोरातांचे वक्तव्य म्हणजे आहेराचं पाकिट नसतानाही जेवणाच्या आशेने चोरून लग्नात जाण्यासारखं- अतुल भातखळकर

“अभिनेत्री विद्या बालनने डिनरसाठी नकार दिल्याने ‘या’ मंत्र्याने थांबवलं सिनेमाचं चित्रीकरण”

आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की…; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान