Home महाराष्ट्र निसर्ग’ चक्रीवादळामुळे नेमकं काय नुकसान होऊ शकतं?

निसर्ग’ चक्रीवादळामुळे नेमकं काय नुकसान होऊ शकतं?

मुंबई : कोरोनाचा सामना करत असतानाच आता एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या दोन राज्यातील समुद्र किनारी तसेत सखल भागात घरं असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय राज्यपालांनी फिरवला, आता नवा वाद सुरु

“निसर्ग आपली परीक्षा घेत आहे आपण ताकदीने याचा सामना करु”

घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान; BCCI ने केलं कौतुक

अजब तुझे सरकार ; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र