Home महाराष्ट्र वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका; अजित पवार यांचं जनतेला...

वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका; अजित पवार यांचं जनतेला आवाहन

मुंबई : कोरोनाचा सामना करत असतानाच आता एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला घरी राहण्याचं आवाहन केलं आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज,दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग,पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरात थांबावं, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असं आवाहान अजित पवार यांनी केलं आहे.

वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये. चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये, म्हणून प्रशासनानं संपूर्ण दक्षता घेतलेली आहे. आवश्यकतेनुसार, नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाईफगार्ड, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Vice Minister

महत्वाच्या घडामोडी-

निसर्ग’ चक्रीवादळामुळे नेमकं काय नुकसान होऊ शकतं?

परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय राज्यपालांनी फिरवला, आता नवा वाद सुरु

“निसर्ग आपली परीक्षा घेत आहे आपण ताकदीने याचा सामना करु”

घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान; BCCI ने केलं कौतुक