Home महत्वाच्या बातम्या “निसर्ग आपली परीक्षा घेत आहे आपण ताकदीने याचा सामना करु”

“निसर्ग आपली परीक्षा घेत आहे आपण ताकदीने याचा सामना करु”

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुकद्वारे संबोधित केलं.

सध्या राज्यात करोनाचं संकट उभं ठाकलं आहे. त्यातच निसर्ग आपली परीक्षा घेत आहे, मात्र आपण ताकदीने याचा सामना करु,  100 ते 125 किमीच्या वेगाने सोसाट्याचा वारा आणि पाऊस असं येणार आहे. त्यामुळे काळजी घ्या प्रशासन तुमच्यासोबत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.

चक्रीवादळ आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ओसरावं किंवा हवेतच नाहीसं व्हावं, अशी माझी प्रार्थना आहे. या प्रार्थनेला यश मिळेल, पण जे काही दिसत आहे ती शक्यता पाहिल्यानंतर हे वादळ उद्या दुपारपर्यंत आपल्या किनाऱ्यावर धडकणार आहे,असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान; BCCI ने केलं कौतुक

अजब तुझे सरकार ; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

“मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज ठाकरेंचा स्वभाव”

केरळ सरकारने महाराष्ट्राला केली ‘ही’ मोलाची मदत; मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार