Home महाराष्ट्र अजब तुझे सरकार ; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

अजब तुझे सरकार ; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मुंबई : कोरोनापासून कधी मुक्तता मिळेल, याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार, असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

दरम्यान, राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठक झाली होती. या बैठकीत उशिरा का होईना, पण परीक्षा घेण्यात यावी असे मत मांडण्यात आले होते. मात्र, यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

महत्वाच्या घडामोडी-

“मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज ठाकरेंचा स्वभाव”

केरळ सरकारने महाराष्ट्राला केली ‘ही’ मोलाची मदत; मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

ग्राहकांसाठी Jio ची खास ऑफर, दररोज मिळणार ‘इतका’ डेटा फ्री

ATKT असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल