Home तंत्रज्ञान ग्राहकांसाठी Jio ची खास ऑफर, दररोज मिळणार ‘इतका’ डेटा फ्री

ग्राहकांसाठी Jio ची खास ऑफर, दररोज मिळणार ‘इतका’ डेटा फ्री

165

मुंबई : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे, यामध्ये ग्राहकांना मोफत हाय स्पीड डेटा देण्यात येत आहे. कंपनीकडून आपल्या ग्राहकांना 5 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा अगदी मोफत दिला जात आहे. पण, ही ऑफर कंपनीकडून काही निवडक ग्राहकांनाच दिली जातेय.

रिलायन्स कंपनीकडून अनेक युजर्सनी मोफत 2GB डेली अ‍ॅड ऑन डेटा पॅक मिळाल्याच्या पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या युजर्सना 5 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा मोफत मिळाला आहे. पण, कोणत्या युजर्सना मोफत डेटा दिला जातोय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, तुम्हाला फ्री डेटा मिळाला आहे की नाही हे तुम्ही ‘माय जिओ’ अ‍ॅपच्या ‘माय प्लॅन्स’ सेक्शनमध्ये जाऊन चेक करु शकतात. इथे तुम्हाला डेटा पॅक टायटलमध्ये डीटेल्स दिसतील. जर तुम्हाला अतिरिक्त डेटा मिळाला असेल तर तुमच्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनसोबत अतिरिक्त डेटाही दिसेल.

महत्वाच्या घडामोडी-

ATKT असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य

जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही- निलेश राणे

…म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा मुंडेंनी केला परळी दौरा रद्द