Home महाराष्ट्र ATKT असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ATKT असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

152

मुंबई : करोनापासून कधी मुक्तता मिळेल, याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला.  यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? या बिरुदावलीने ओळखले तर जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का?, असा सवाल करत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

दरम्यान, पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी .मुख्यमंत्र्याना आज मी पत्र लिहिलं आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य

जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही- निलेश राणे

…म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा मुंडेंनी केला परळी दौरा रद्द

“पुन:च्छ हरिओम करायची वेळ आली आहे; हळूहळू आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात करु”