Home महत्वाच्या बातम्या अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा अजित पवारांना...

अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे.

अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. अजित पवार जिथे जातील तिथे आम्ही जाऊ. विधानसभेत अजित पवार यांच्या इतका ताकदवार नेता नाही. तेच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत, अशी भूमिका या दोन्ही आमदारांनी जाहीरपणे घेतली आहे. त्यामुळे राजकारणातील घडामोडी आणखी कोणत्या दिशेला जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा हादरा; ‘या’ युवा नेत्याचा शिंदें गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान,अण्णा बनसोडे मुंबईला रवाना झाले आहेत. अजित पवार यांनी आपल्याला मुंबईला बोलवलं असल्याचा दावा त्यांनी केलाय.अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल”, असं अण्णा बनसोडे यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो, मात्र…; उध्दव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

“गुजरातवर राजस्थान भारी, संजू सैमसन-हेटमायरने सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”

जयंत पाटलांचं, उद्धव ठाकरेंच्या समोरच अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…