Home क्रीडा “गुजरातवर राजस्थान भारी, संजू सैमसन-हेटमायरने सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”

“गुजरातवर राजस्थान भारी, संजू सैमसन-हेटमायरने सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदाबाद : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने गुजरातचा 3 विकेट्सने पराभव केला.

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावत 177 धावा केल्या. गुजरातने डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 46 धावांची खेळी केली. मिलरच्या या खेळीत 3 चाैकार, 2 षटकारांचा समावेश होता. तर शुभमन गिलने 34 चेंडूत 45 धावा केल्या. तर राजस्थानकडून संदीप शर्माने 2, तर युझवेंद्र चहल, अॅडम जैम्पा व ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : जयंत पाटलांचं, उद्धव ठाकरेंच्या समोरच अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…

दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानने हे लक्ष्य 19.3 षटकात 7 विकेट गमावत पूर्ण केलं. धावसंख्येचा पाठलाग करत असताना राजस्थानची सुरूवात मात्र खराब झाली. राजस्थानने खराब सुरूवात करत 10.3 षटकात आपल्या 4 विकेट गमावल्या. मात्र नंतर शिमरन हेटमायर व कर्णधार संजू सैमसनने 59 धावांची भागीदारी करत राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. मात्र मोठा धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कर्णधार सैमसन बाद झाला. सैमसनने 32 चेंडूत 60 धावांची विस्फोटक खेळी केली. सैमसनने आपल्या या खेळीत 3 चाैकार, 6 षटकार लगावले. नंतर मात्र शिमरने हेटमायरने खेळाची सर्व सूत्रे हाती घेत राजस्थानला विजय मिळवून दिला. हेटमायरने 26 चेंडूत नाबाद 56 धावांची वेगवान खेळी केली. हेटमायरच्या या खेळीत 2 चाैकार, 5 षटकारांचा समावेश होता.

महत्त्वाच्या घडामोडी 

नाशिकमध्ये राजकीय भूकंप होणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह 11 माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये

सिकंदर रजा, शाहरूख खानची मॅच विनिंग खेळी, पंजाबचा लखनाैवर 2 विकेट्सने विजय

महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याचं अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…