Home नागपूर जयंत पाटलांचं, उद्धव ठाकरेंच्या समोरच अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…

जयंत पाटलांचं, उद्धव ठाकरेंच्या समोरच अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे, अजित पवारांबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

अजित पवार आजच्या नागपूरच्या वज्रमूठ सभेला येणार नाहीत, अशी चर्चा होती. पण अजित पवार आज सभेला हजर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंचावर अजित पवार यांच्यासमोर शायरीतून मोठं वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा : नाशिकमध्ये राजकीय भूकंप होणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह 11 माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये

अजित पवार आजच्या नागपूरच्या वज्रमूठ सभेला येणार नाहीत, अशी चर्चा होती. पण अजित पवार आज सभेला हजर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंचावर अजित पवार यांच्यासमोर शायरीतून मोठं वक्तव्य केलं आहे.

उद्धवजी मला एक आपल्याला एक सांगायचं आहे, कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, युहीं कोई बेवफा नहीं होता. काहीतरी अडचण असेल. कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबुरी असेल, काहीतरी प्रोब्लेम असेल, अब समज लो, अब क्या करोंगे? पण महाराष्ट्रातील जनता या महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. मला खात्री आहे, उद्धवजी तुम्हाला कुणीही सोडून गेलं असलं तरी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना जे स्थान मातोश्रीला पूर्वी होतं ते स्थान आजही राहिलेलं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते, अजित पवार यांच्याबद्दल गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने उलटसुलट चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले होते. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, ईव्हीएमचा मुद्द्यासह काही मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या विरोधात भूमिका मांडली होती. त्यामुळे अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

सिकंदर रजा, शाहरूख खानची मॅच विनिंग खेळी, पंजाबचा लखनाैवर 2 विकेट्सने विजय

महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याचं अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…

“मोठी बातमी! राहुल गांधी, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेणार भेट”