Home महाराष्ट्र चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, ड्यूप्लेसिस-मैक्सवेलची खेळी व्यर्थ, चेन्नईची RCB वर 8 धावांनी मात

चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, ड्यूप्लेसिस-मैक्सवेलची खेळी व्यर्थ, चेन्नईची RCB वर 8 धावांनी मात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बेंगलोर : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने बेंगलोरचा 8 धावांनी पराभव केला.

या सामन्यात बेंगलोरने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावत 226 धावांचा डोंगर उभा केला. चेन्नईकडून डेव्हाॅन काॅनवेने 45 चेंडूत 83 धावांची विस्फोटक खेळी केली. काॅनवेच्या या खेळीत 6 चाैकार, 6 षटकारांचा समावेश होता. तर शिवम दुबेने 27 चेंडूत 52 धावांची वेगवान खेळी केली. दुबेने आपल्या या खेळीत 2 चाैकार, 5 षटकार ठोकले. तर अजिंक्य रहाणेने 20 चेंडूत 37 धावांची विस्फोटक खेळी केली. रहाणेच्या या खेळीत 3 चाैकार, 2 षटकारांचा समावेश होता. तर बेंगलोरकडून मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, ग्लेन मैक्सवेल, वानिंदू हसरंगा, विजय कुमार व्यास्क, हर्षेल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ही बातमी पण वाचा : अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा

दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना बेंगलोरने 20 षटकात 8 विकेट गमावत 218 धावा केल्या. बेंगलोरकडून कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मैक्सवेलची शतकीय भागीदारी व्यर्थ ठरली. फाफने 33 चेंडूत 62 धावांची खेळी केली. फाफच्या या खेळीत 5 चाैकार, 4 षटकारांचा समावेश होता. मैक्सवेलने 36 चेंडूत 76 धावांची विस्फोटक खेळी केली. मैक्सवेलच्या या खेळीत 3 चाैकार, तर 8 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. तर दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 28 धावांची खेळी केली. तर चेन्नईकडून तुषार देशपांडने 3, महिषा पाथिरानाने 2, तर आकाश सिंग, महिष तीक्षणा, मोईन अलीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा हादरा; ‘या’ युवा नेत्याचा शिंदें गटात प्रवेश

तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो, मात्र…; उध्दव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

“गुजरातवर राजस्थान भारी, संजू सैमसन-हेटमायरने सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”