Home महाराष्ट्र आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांनी सांगितली रणनीती, म्हणाले…

आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांनी सांगितली रणनीती, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक उद्या मुंबईत होणार आहे. मुंबईच्या ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून ही बैठक यशस्वी होण्याकरता राज्यातील महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे.

भाजपाला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहे. मात्र, या निवडणुकीत सर्वात मोठी अडचण ठरणार आहे ती जागा वाटपाची. जवळपास सर्वच पक्ष एकत्र आल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. या जागावाटपाबाबत उद्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा : ‘या’ मोठ्या नेत्याने सोडली भाजपची साथ; म्हणाले, ‘तुमची मोठी पार्टी, मग…’

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या. उद्याच्या बैठकीत इथून पुढे सामूहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेवेळी असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का यासंदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांचा मोठा डाव, एकनाथ खडसेंच्या कन्या, रोहित खडसेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी साजरा होणार महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस

सांगली आकाशवाणी केंद्राचे सतारवादक उस्ताद रफीक नदाफ काळाच्या पडद्याआड