Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी साजरा होणार महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी साजरा होणार महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते, कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणजे १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत घसघशीत वाढ करणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर कार्यक्रमात केली. या कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. अजित पवार यांच्या मागणीला एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आणि आपल्या भाषणात याबाबत मोठी घोषणा केली.

ही बातमी पण वाचा : सांगली आकाशवाणी केंद्राचे सतारवादक उस्ताद रफीक नदाफ काळाच्या पडद्याआड

पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 साली भारताला कुस्तीतील पहिलं ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकून दिलं होतं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अजित पवार यांनी महत्त्वाची मागणी केली होती.

दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव, तर क्रीडापटू, संघटकांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सत्तेत सहभागी होण्यासाठी, शरद पवारांनीच मार्गदर्शन केलं; ‘या’ आमदाराच्या वक्तव्याने खळबळ”

“मी सत्तेसाठी हापापलेला कार्यकर्ता नाही, तर…”

मविआ सरकारच्या काळात, फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, पण…;