Home नाशिक ‘स्वराज्य’ इंडिया आघाडीत सामील होणार?; संभाजीराजे छत्रपतींकडून स्पष्टीकरण, म्हणाले…

‘स्वराज्य’ इंडिया आघाडीत सामील होणार?; संभाजीराजे छत्रपतींकडून स्पष्टीकरण, म्हणाले…

नाशिक : देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत देशभरातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. अशात राज्यातील पक्षांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. माजी खासदार, संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षालाही निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा होती. तसंच संभाजीराजे या बैठकीला उपस्थित राहतील, अशीही चर्चा होती. यावर आता खुद्द संभाजीराजे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

स्वराज्य पक्षाचा इंडिया आघाडीशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण संभाजीराजे छत्रपतींनी यावेळी दिलं.

ही बातमी पण वाचा : आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांनी सांगितली रणनीती, म्हणाले…

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील यांनी स्वराज्य पक्षाचे नाव घेतलं. मात्र आमच्याच अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. जयंत पाटील असं विधान करून दिशाभूल करत आहेत. तसेच स्वराज्य पक्षाचा इंडिया आघाडी किंवा महायुतीशी कोणताही संबंध नाही. आज इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होतेय. मात्र बैठकीचं स्वराज्य पक्षाला कोणतंही निमंत्रण देण्यात आलेलं नाही, असंही गायकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

मविआच्या बैठकीतून शरद पवारांचा, अजित पवार गटाला इशारा, म्हणाले, त्यांना त्यांची जागा…

“शरद पवारांचा मोठा डाव, एकनाथ खडसेंच्या कन्या, रोहित खडसेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी साजरा होणार महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस