केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज ठाकरे यांची भेट होणार की नाही? ; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

0
588

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी विराजमान श्रीगणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमित शहा लवकरच मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस भेटीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

गणेशोत्सवादरम्यान अमित शाह मुंबईत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे, ते यावेळी भाजपाची बैठकीलाही उपस्थित राहणार आहे, याव्यतिरिक्त त्यांचे कोणतेही कार्यक्रम नाहीत,  असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार?”

महिलांबाबत आदर असलाच पाहिजे; मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी

उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे आहेत, हे आपण जबाबदारीने बोलतोय; शिंदे गटातील नेते रामदास कदमांचं वादग्रस्त विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here