Home महाराष्ट्र भाजपला धक्का; सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

भाजपला धक्का; सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले असून देशातील अग्रगण्य बाजार समिती मानल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडी सरकारने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली असून 18 पैकी 17 जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. तर एका जागेवर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपचा महाविकासआघाडीला मोठा धक्का; दोन ठिकाणी फुललं कमळ

दरम्यान, या निवडणुकीत भाजपाचे कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील ,माजी आमदार विलासराव जगताप यांनी मविआच्या नेत्यांपुढे आव्हान उभे केले हाेते. मात्र मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, माजी मंत्री अजित घोरपडेयांचे नेतृत्व स्विकारात महाविकास आघाडीला निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“धनंजय मुंडेंचा जलवा, बीडमध्ये भाजपला धोबीपछाड करत राखली एकहाती सत्ता”

काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; तिवसा बाजार समितीत काँग्रेसची मुसंडी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाआधी, ठाकरेंचा शिंदेंना दणका, ‘या’ निवडणूकीत मिळवली एकहाती सत्ता”