Home महत्वाच्या बातम्या निवडणूक आयोगाचं पारडं कोणाच्या बाजूने; उज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले….

निवडणूक आयोगाचं पारडं कोणाच्या बाजूने; उज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले….

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षावर कुणाचा दावा, पक्षचिन्ह कुणाचं यावर सुनावणी होत आहे. या पार्श्वूमीवर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी यावर भाष्य केलं. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. परंतु या स्वायत्त संस्थेविषयी जनमानसात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्षांचं अधिकृत निवडणूक चिन्ह कुणाला द्यावे हा निर्णय घेताना त्या राजकीय पक्षात फूट पडली आहे का? हे पाहिलं जातं, असं उज्वल निकम म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांना मोठा धक्का; हा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

“अशा प्रकरणात निवडणूक आयोग प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार करत असतं. पक्षाच्या घटनेनुसार संघटना कुणाच्या ताब्यात आहे आणि त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे बहुमत कुणाकडे आहे या दोन गोष्टी आहेत. आज अजित पवार यांच्याकडे लोकप्रतिनिधींचे बहुमत दिसत असले, तरी त्याबाबतची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल झाली आहेत का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असंही उज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘हा’ फायदा

भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत…; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान

ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप नंबर वन; कुणाच्या पारड्यात किती जागा? वाचा सविस्तर