Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभणारं नाही, त्यांना लाॅलीपाॅप चिन्ह द्या, ते शोभेल-...

उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभणारं नाही, त्यांना लाॅलीपाॅप चिन्ह द्या, ते शोभेल- निलेश राणे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत आता 2 गट पडले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा तर दुसरा उद्धव ठाकरे यांचा. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाचा?, हा सवाल आता उपस्थित होत आहे. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभणारं नाही, त्यांना कुठलं तरी देऊन टाका लॉलीपॉप वगैरे. ते शोभेल, धनुष्यबाण शोभणारं नाही, असा टोला निलेश राणेंनी यावेळी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र ना कधी झुकला आहे, ना कधी झुकणार; शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे, गरजल्या

शिवसेना कुणाचा पक्ष आहे, हा वाद सध्या न्यायालयात सुरु आहे. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. पण धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते आत्ता उद्धव ठाकरेंना शोभणारं नाही. ते बिनकामाचे आहेत, म्हणून ज्याला जे चिन्ह शोभेल, तसे त्या माणसाला मिळायला हवं. पण आता ते न्याय प्रविष्ट असल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण ते स्वतःच म्हणतायत आता सगळे बाण निघून गेले. हे फक्त रिकाम टेकडे धनुष्य घेऊन बसलेत. त्यांना ते चिन्ह शोभणारं नाही. या चिन्हासाठी कुणीतरी रफटफ माणूस पाहिजे. जसे बाळासाहेब होते. त्यांना शोभायचं ते चिन्ह. यांना कुठलं तरी देऊन टाका लॉलीपॉप वगैरे. ते शोभेल, धनुष्यबाण शोभणारं नाही., असं निलेश राणे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र ना कधी झुकला आहे, ना कधी झुकणार; शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे, गरजल्या

खरी शिवसेना कुणाची?; शिंदेंची की ठाकरेंची?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ महिला खासदाराच्या घटस्फोटित पतीने हाती बांधलं शिवबंधन