Home महाराष्ट्र खरी शिवसेना कुणाची?; शिंदेंची की ठाकरेंची?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

खरी शिवसेना कुणाची?; शिंदेंची की ठाकरेंची?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत आता 2 गट पडले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा तर दुसरा उद्धव ठाकरे यांचा. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची?, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यावरून आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांना विलीनीकरण करावे लागल्यास काय पर्याय असेल? असा सवाल केला असता. आठवलेंनी एक मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री माझ्या पक्षात आल्यास मला आनंद होईल, मी टेबलावर उभा राहून त्या सर्वांचा स्वागत करेल, असं आठवले म्हणाले.

हे ही वाचा : मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ महिला खासदाराच्या घटस्फोटित पतीने हाती बांधलं शिवबंधन

दरम्यान, दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. तसेच 12 खासदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरेंकडील नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आहे. अशातच शिंदे गटाकडे विलीनीकरणाचा पर्याय उरल्यास तुमचं काय मत आहे? असा सवाल आठवले यांना करण्यात आला. त्यावेळी आठवलेंनी, मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल, शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर, मी टेबलावर उभा राहून त्यांचं स्वागत करेल, असं आठवले म्हणाले. तसेच शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि बरी शिवसेना ठाकरेंची आहे, असंही आठवलेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ आमदाराची बहीण उद्धव ठाकरेंसोबत; दिले ‘हे’ मोठे संकेत”

संभाजीनगर नामकरण वाद हायकोर्टात; ‘या’ दिवशी होणार सुनावणी

भाजपचे अनेक निष्ठावंत आमच्या संपर्कात; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा