“उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली”

0
342

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो, असं वक्तव्य भाजप नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा आरक्षणाची जबाबदारी मी घेतो, असं म्हणून उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखविली आहे, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळेच मराठा समाजाच्या मनात ही भावना आहे., असंही दरेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“विकासाकडे नेणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, मात्र नारायण राणें सारखा डराव डराव करणारा बेडूक नको”

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; 8 डिसेंबरला मुंबईत आंदोलन मोर्चा

राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग- सुधीर मुनगंटीवार

नो कोरोना नो, कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा; रामदास आठवलेंची नवी कविता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here