परिवहन मंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम; केली ‘ही’ महत्त्वाची सूचना”

0
521

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. तसेच अजूनही हे आंदोलन सूरूच आहे. सरकारने पगारवाढ करूनही संप अजूनही सूरूच आहे. यावरून आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

हे ही वाचा : “जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो, राजकीय चर्चांना उधाण”

एसटी कर्मचारी जर सोमवारपर्यंत कामावर हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारची कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी लवकर कामावर हजर राहावं, असं आवाहन अनिल परब यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना केलं. ते एसटी महामंडळाच्या कार्यालयात बोलत होते.

दरम्यान, राज्यातील एकूण 10 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. सरकार या कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहे. पण कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची माहिती अनिल परब यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप नेते किरीट सोमय्यांनी आता धनंजय मुंडेंवर केला ‘हा’ गंभीर आरोप, म्हणाले…

पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपाची सत्ता घालवायची आहे, त्यामुळे…; अजित पवारांच मोठं वक्तव्य

भाजपकडून शिवसेनेला खिंडार; शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here