“जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो, राजकीय चर्चांना उधाण”

0
539

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो गायब झाले असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा फोटो या बॅनरवर आहे. तसेच या बॅनरचे फोटो सोशल मिडियात धुमाकुळ घालत आहे.

हे ही वाचा : भाजप नेते किरीट सोमय्यांनी आता धनंजय मुंडेंवर केला ‘हा’ गंभीर आरोप, म्हणाले…

संजय सावकारे यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर केवळ भाजप खासदार रक्षा खडसे यांचा फोटो आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सावकारे काहीसे एकाकी पडल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांकडून देण्यात येणाऱ्या शुभेच्छांच्या बॅनरवर आता भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब झाल्याने खडसें पाठोपाठ सावकारे ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपाची सत्ता घालवायची आहे, त्यामुळे…; अजित पवारांच मोठं वक्तव्य

भाजपकडून शिवसेनेला खिंडार; शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर?

इचलकरंजी नगरपालिका भाजपमुक्त करायची- सतेज पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here