“आपलं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी, ठाकरेंकडून महिलांचा ढाल म्हणून वापर”

0
260

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. या वादात आता मनसेनं उडी घेतली आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : “दुर्गा भोसलेंच्या अंत्यदर्शनासाठी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शेकडो शिवसैनिक दाखल, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर”

‘स्वतःचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे हे महिलांचा वापर करत आहेत. त्यांचा ढाल म्हणून पुढे करत आहेत. , असा आरोप प्रकाश महाजन यांनी यावेळी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि संयमी माणसाचे मूल्यमापन अशा शब्दात करणे उद्धव ठाकरेंसाठी अशोभनीय आहे. उद्धव ठाकरेंचा सल्लागार कोण आहे असा प्रश्न मला पडतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वतःचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे महिलांची ढाल पुढे करत आहेत. हा किती विचित्र प्रकार आहे, अशी टीका महाजन यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या घडामोडी 

“कोरोना पुन्हा फैलावतोय, सांगली कारागृहात कोरोनाची एंट्री, प्रशासन अलर्टवर”

काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

एकमेकांवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला; ठाकरे-फडणवीस वादावर ‘या’ नेत्याची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here