Home महाराष्ट्र एकमेकांवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला; ठाकरे-फडणवीस वादावर ‘या’ नेत्याची टीका

एकमेकांवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला; ठाकरे-फडणवीस वादावर ‘या’ नेत्याची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. यामध्ये आता माजी खासदार संभाजीराजे यांनीही आता या वादात उडी घेतली आहे.

ही बातमी पण वाचा : शिखर धवन-प्रभसिमरण सिंगची विस्फोटक खेळी, अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पंजाबची राजस्थानवर 5 धावांनी मात

एकमेकांवर टीका करण्यापेक्षा राज्याच्या विकासावर चर्चा करणे, त्यासाठी विकासात्मक राजकारण करणे गरजेचे आहे, मत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे व्यक्ती दोष ठेऊन राज्याचे राजकारण ज्या प्रमाणे सत्ताधाऱ्यांनी करू नये त्याच प्रमाणे विरोधकांनीही करू नये, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

दरम्यान, विकासात कोणी चुकत असेल तर नक्की बोलावे, मात्र व्यक्ती दोष ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सध्या राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

त्त्वाच्या घडामोडी 

आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस म्हणू नका, अन्यथा…; भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंना इशारा

…तर 48 तासांमध्ये मातोश्रीवर येऊन दाखवाच; सुषमा अंधारेंचं, बावनकुळेंना ओपन चॅलेंज

…त्यामुळे उद्धव ठाकरे तुरूंगात जाणार?; नारायण राणेंचं मोठं विधान ‌