Home महत्वाच्या बातम्या उद्धव ठाकरेंना आवाहन देणाऱ्या खासदार नवनीत राणांना, गुलाबराव पाटलांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरेंना आवाहन देणाऱ्या खासदार नवनीत राणांना, गुलाबराव पाटलांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की, तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा, असं आवाहन नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना यावेळी द्यावं. तसंच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येऊन दाखवेन, तेंव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल, असंही राणा म्हणाल्या. यावरून आता शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

त्यांनी लोकांना मुख्यमंत्री केले, आमच्यासारख्या लोकांना मंत्री केले आहे. त्यांना निवडणुकीस उभा राहण्याची गरज नाही. उभे राहण्याची गरज त्यांना(राणा दाम्पत्यास) आहे. ते निवडणुकीस उभा राहताना कोणत्या पक्षातून आले त्यांना मायबाप माहीत नव्हता त्या पक्षाचा, त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, असा जोरदार पलटवार गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यामुळे…- रामदास आठवले

“धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार, त्यांनी गोपीनाथ मुंडेंप्रमाणे महाराष्ट्राचं नेतृत्व करावं”

“रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच, नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना आवाहन, म्हणाल्या, तुमच्यात जर हिंमत असेल तर…”