Home पुणे “मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना...

“मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आल्यानंतर मोरे पक्ष सोडणार, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र त्यानंतर मोरे यांना अनेक पक्षांकडून ऑफर येत असतानाच ठाण्याच्या सभेत वसंत मोरे हजर राहिले आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.

राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला भोंगे काढण्याचे आवाहन केलं होतं. 3 मे रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात आंदोलनही केलं होतं. मात्र मोरे हे यापासून दूर असल्याचं पहायला मिळालं. यामुळे मोरे पुन्हा पक्ष सोडणार, अशा चर्चा सूरू झाल्या. यानंतर मोरे यांनी मी, मनसेसोबत असल्याचं म्हणत या चर्चा फेटाळून लावल्या.

हे ही वाचा : राज ठाकरेंनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यामुळे…- रामदास आठवले

काल मोरेंच्या हस्ते पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र राज ठाकरे पुण्यात असताना देखील या महाआरतीला उपस्थित नव्हते. यावरून पुन्हा राज ठाकरे वसंत मोरे यांच्यात नाराजी असल्याच्ये चर्चा रंगल्या होत्या. मात्र राज ठाकरे यांनी मोरे यांना फोन केला होता. त्यानंतर लगेज मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीत राज ठाकरे यांनी आपलं कौतुक केलं, असं मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार, त्यांनी गोपीनाथ मुंडेंप्रमाणे महाराष्ट्राचं नेतृत्व करावं”

“रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच, नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना आवाहन, म्हणाल्या, तुमच्यात जर हिंमत असेल तर…”

“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”