Home महाराष्ट्र जबाबदार पदावर असणाऱ्यांनी…; मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं

जबाबदार पदावर असणाऱ्यांनी…; मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याला मोठा झटका दिलाय. राणा दाम्पत्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका फेटाळताना न्यायालयाने राणा दाम्पत्यांची कानउघडणी केली.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात किंवा निवासस्थानाबाहेर म्हणजेच रस्त्यावर हनुमान चालिसा म्हणू, अशी राणा दाम्पत्याची घोषणाच अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारे आहे, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे.

हे ही वाचा : “शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या दिल्लीत दाखल, म्हणाले…; आता तुमच्याविरूद्ध…”

नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाच एफआयआर रद्द करण्याच्या विनंती रिट याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

जबाबदार पदावर असणाऱ्यांनी विशेषकरून लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदराने बोलावे आणि वागावे असे आम्ही वारंवार म्हटलं आहे. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात. लोकप्रतिनिधींकडून याप्रकरणी काही अपेक्षा करणे चुकीचे आहे,” अशा शब्दांत न्यायालयाने सुनावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

थप्पड से डर नही सकता साहब, हनुमान चालिसा से डर लगता है; मनसेचा शिवसेनेला टोला

हिंमत असेल तर राणा दाम्पत्याने बाहेर पडून दाखवावं; शिवसैनिकांचं खुलं आवाहन

“गरज पडली तर दिल्लीत कोणालाही टक्कर देईल, ही महाराष्ट्रात धमक आहे, असा छत्रपतींचा इतिहास आहे”