Home महाराष्ट्र शिंदे आजींच्या भेटीवरुन मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…

शिंदे आजींच्या भेटीवरुन मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आमदार रवी राणा ,खासदार नवनीत राणा  यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. तर राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक मातोश्री बाहेर जमले होते. आंदोलन करणाऱ्या या शिवसैनिकांमध्ये 80 वर्षांच्या आजींनी लक्ष वेधून घेतले होते.

“झुकेगा नहीं साला” म्हणत मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानसमोरुन आमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना इशारा देणाऱ्या मुंबईतील आजीबाईंच्या भेटीसाठी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांच्या घरी पोहोचले.

हे ही वाचा : जबाबदार पदावर असणाऱ्यांनी…; मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं

रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसहीत उद्धव यांनी या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीवरून मनसेने त्या आजींचे आभार मानत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

त्या आजींचा सत्कार केला पाहिले. त्यांच्या निमित्ताने का होईना मुख्यमंत्री घराबाहेर पडले. धन्यवाद आजी, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या दिल्लीत दाखल, म्हणाले…; आता तुमच्याविरूद्ध…”

थप्पड से डर नही सकता साहब, हनुमान चालिसा से डर लगता है; मनसेचा शिवसेनेला टोला

हिंमत असेल तर राणा दाम्पत्याने बाहेर पडून दाखवावं; शिवसैनिकांचं खुलं आवाहन