Home पुणे “गरज पडली तर दिल्लीत कोणालाही टक्कर देईल, ही महाराष्ट्रात धमक आहे, असा...

“गरज पडली तर दिल्लीत कोणालाही टक्कर देईल, ही महाराष्ट्रात धमक आहे, असा छत्रपतींचा इतिहास आहे”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जुन्नूर : गरज पडली तर महाराष्ट्र, दिल्लीत कोणालाही टक्कर देईल अशी महाराष्ट्रात धमक आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवार यांच्या हस्ते जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ स्मारकाचे अनावरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रेरणा मिळते. त्यांचा आदर्श ठेवूनच आपल्याला पुढे जायचं आहे. देशावर, दिल्लीवर संकट आलं, त्या त्यावेळी महाराष्ट्र देशाच्या रक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. यापुढं देखील, आपल्या देशावर जेव्हा, जेव्हा संकट येईल, देश वाचवण्यासाठी वेळ येईल तेंव्हा महाराष्ट्र नक्की मदतीला धावून जाईल असा विश्वास आहे, असा दावा अजित पवारांनी यावेळी केला.

हे ही वाचा : निवडणूकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता, आता तो बदलला; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल

दरम्यान, शरद पवार नेहमी सांगतात, महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकलेला नाही. यापुढं झुकणार देखील नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन पुढं जायचं आहे, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

मातोश्रीकडे येण्याची कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही आता घरी जा; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना सूचना

उद्या वाजता हनुमान चालिसा वाचण्यासाठी मातोश्रीवर जाणारच; राणा दाम्पत्याचा निर्धार

‘….म्हणून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो’; राजू शेट्टींचा खुलासा