…तर दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार कोसळेल; एकनाथ खडसेंचा दावा

0
433

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत बोलताना भविष्यवाणी केली आहे.

आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार कोसळेल, असा दावा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला आहे. तसेच शिंदे गटाचे 50 आमदार अस्वस्थ असल्याचा दावाही खडसेंनी यावेळी केला. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

मंत्रिपद मिळण्याबाबत आपसातल्या भानगडीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल. त्यामुळे हे सरकार कोसळण्याची वेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा गाैफ्यस्फोट खडसेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेचा शेवट जवळ आला आहे; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

“शिवसेनेचा काँग्रेसला धक्का; ‘या’ आक्रमक नेत्यानं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांंधलं शिवबंधन”

ठाकरे घरातल्या सुंदर व्यक्तीमुळे एका व्यक्तीचा खून झाला?; निलेश राणेंच्या ट्विटने खळबळ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here