शिवसेनेचा शेवट जवळ आला आहे; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

0
267

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  भाजपाचे मंत्री नारायण राणे हे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतेच वरळी येथील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुन नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये ते उरले-सुरले आमदारही हे शिंदे गटात प्रवेश करतील, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

हे ही वाचा :  “शिवसेनेचा काँग्रेसला धक्का; ‘या’ आक्रमक नेत्यानं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांंधलं शिवबंधन”

शिनसेनेतील बंड हे काही एका दिवसाचे नव्हते. आताही ते सुरुच आहे. आमदार-खासदार नंतर आता पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा शेवट जवळ आला असून ते सावरायला आता कोणी नाही, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना प्रमुख असते तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री हे झालेच नसते. कारण त्यांना माहित होते की पदाला न्याय कोण देऊ शकतो आणि कोण नाही? असा टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ठाकरे घरातल्या सुंदर व्यक्तीमुळे एका व्यक्तीचा खून झाला?; निलेश राणेंच्या ट्विटने खळबळ

“सोलापूरात युवासेनेचा झेंडा फडकला, युवासेना उमेद्वार उषा पवार यांचा दमदार विजय”

शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here