Home महाराष्ट्र ‘…तर फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा’, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

‘…तर फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा’, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

108

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे – शिंदे गटात राडा ; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरच दोन्हीं गट भिडले

“मराठा आरक्षण दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांचा तो शब्द पाळावा. सरकारचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांनीही मराठा समाजाला आरक्षणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. आरक्षणासाठी वारंवार मराठा समाजाला अशा पद्धतीची खेळवत राहणं ही सरकारची भूमिका योग्य नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, टिकणार आणि कायदेशीर चौकटीत बसणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळायला पाहिजे , अशी अपेक्षा आहे”, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

गजानन कीर्तिकरांवर टीका करताना, शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली, म्हणाले…

दिपावली सणाचे औचित्य साधून गोपाळकृष्ण शाळेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन 

माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी…; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा