Home महाराष्ट्र माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी…; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी…; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

146

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. शिंदे गटाने मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी दाखल झाले होते.

यावेळी तिथे शिंदे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटाच मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बॅरिकेड्सजवळून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भाषण करत शिंदे गटाला इशारा दिला आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांसोबत झालेली भेट ही…; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

या खोके सरकारने आमची शाखा पाडून तिकडे एक खोका अडवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. तो खोका लवकरात लवकर उचला नाहीतर, आम्ही तो खोका उचलून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. या शाखेची सगळी कागदपत्रे आमच्याकडे आहेत, असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

अरे नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजुला ठेवा आणि समोर या… दिल्लीच्या कृपेनं आज तुम्ही सत्तेत बसला आहात. कठपुतली आणि बाहुल्यांनो.. तुमच्यात हिंमत नाही. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजुला ठेवा आणि आम्हाला भिडा. आमची तयारी आहे, असंही उध्दव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने मी तिकडे जाऊन उभा राहिलो. बघू कुणाच्यात किती हिंमत आहे. माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी यांचे सगळे केस तमाम महाराष्ट्र उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार आले एकत्र; पुण्यात झाली भेट

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन; राज ठाकरे घेणार विदर्भात सभा

शरद पवारांना मोठा धक्का; हा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश