Home महाराष्ट्र …तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता- अभिजीत बिचुकले

…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता- अभिजीत बिचुकले

327

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 13 आमदारांसह गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याची सर्वोतोपरी प्रयत्न सूरू आहेत.

अशातच एकनाथ शिंदेंकडून, भाजपसोबत सरकार स्थापन करावं, अशी अट पक्षप्रमुखांना घालण्यात आल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच शिंदेंची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे काही वेळापूर्वी सुरतमध्ये पोहचले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून जवळपास 40 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली. या सर्व प्रकरणावर आता बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही  वाचा : एकनाथ शिंदेंच्या नाराजीपट्ट्यावर मनसेचा खोचक शिवसेनेला टोला, म्हणाले… 

बिचुकले यांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया देत शिंदेंना फटकारलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी आज एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, अशी प्रतिक्रिया बिचुकलेंनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी फोनवरून साधला संवाद; नेमकी कोणत्या मुद्दयांवर झाली चर्चा?”

“एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य, गद्दारी त्यांच्या रक्तात नाही”

“ सत्तेसाठी आम्ही कधीही…” ; एकनाथ शिंदे यांनी केलं ट्वीट