Home महाराष्ट्र “मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी फोनवरून साधला संवाद; नेमकी...

“मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी फोनवरून साधला संवाद; नेमकी कोणत्या मुद्दयांवर झाली चर्चा?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 13 आमदारांसह गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे काही वेळापूर्वी सुरतमध्ये पोहचले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून जवळपास 40 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली.

मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती टी.व्ही. 9 मराठीनं दिली आहे.

हे ही  वाचा : “एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य, गद्दारी त्यांच्या रक्तात नाही”

दरम्यान, या संवादात, मी आतापर्यंत पक्षाविरोधी कोणतंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे मला गटनेते पदावरून का काढण्यात आलं असा सवाल एकनाथ शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारल्याचं समोर येत आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली असल्याचं समोर आलं आहे. संजय राऊत प्रत्यक्षात एक आणि माध्यमांत दुसरं बोलत असल्याचा आरोप देखील एकनाथ शिंदेंनी या संवादात केला असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“ सत्तेसाठी आम्ही कधीही…” ; एकनाथ शिंदे यांनी केलं ट्वीट

शिवसेनेला मोठा झटका! एकनाथ शिंदेंसह 13 आमदार नॉट रिचेबल

योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार; पुढील 2 महिन्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार”