Home महाराष्ट्र एकनाथ शिंदेंच्या नाराजीपट्ट्यावर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला, म्हणाले…

एकनाथ शिंदेंच्या नाराजीपट्ट्यावर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 13 आमदारांसह गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याची सर्वोतोपरी प्रयत्न सूरू आहेत.

अशातच एकनाथ शिंदेंकडून, भाजपसोबत सरकार स्थापन करावं, अशी अट पक्षप्रमुखांना घालण्यात आल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच शिंदेंची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे काही वेळापूर्वी सुरतमध्ये पोहचले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून जवळपास 40 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही  वाचा : “मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी फोनवरून साधला संवाद; नेमकी कोणत्या मुद्दयांवर झाली चर्चा?”

“२१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?” , असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य, गद्दारी त्यांच्या रक्तात नाही”

“ सत्तेसाठी आम्ही कधीही…” ; एकनाथ शिंदे यांनी केलं ट्वीट

शिवसेनेला मोठा झटका! एकनाथ शिंदेंसह 13 आमदार नॉट रिचेबल