…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

0
284

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना मोठं विधान केलं होतं.

दादांसारखा नेता अशा पदावर गेल्यास त्याचा फायदा राज्याला होईल, असं मत  आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. ते माध्यमांशी बोलत होते. यावरून आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : …तर यावर एकच उपाय, तो म्हणजे डॉ. शिंदे साहेब; मंत्री शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना टोला

आपल्या देशात लोकशाही आहे.राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली. त्यांच्याकडे बहुमत आलं. तर निश्चितपणे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मत रावसाहेब दानवेंनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचा एखादा मुख्यमंत्री होत असेल चांगली गोष्ट आहे. दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेल्यास राज्याला, पार्टीला त्याचा फायदा होईल. राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र लढतोय. उद्धव ठाकरे यांचा गट एकत्र आल्यास याचा अधिक फायदा सर्वांना होणार आहे. त्यासंदर्भात निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेत असतात. मोठे निर्णय झाल्यानंतर आमच्यासारखे आमदार त्यांना स्वीकारतात. पण, असा नेता असावा की, जो स्वतः निर्णय घेऊ शकतो., असं रोहित पवार म्हणाले होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

दादांसारखा नेता मुख्यमंत्रीपदी असावा; आमदार रोहित पवारांचं मोठं विधान

“ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाची ‘तब्बल’ इतकी लाख प्रतिज्ञापत्रं रद्द?”

“राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘हा’ मोठा नेता पवारांच्या उपस्थितीत हाती बांधणार घड्याळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here