Home महाराष्ट्र …तर यावर एकच उपाय, तो म्हणजे डॉ. शिंदे साहेब; मंत्री शंभूराज देसाईंचा...

…तर यावर एकच उपाय, तो म्हणजे डॉ. शिंदे साहेब; मंत्री शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड केलं. आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे 2 गट झालेत. यानंतर या दोन्ही गटातील नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला.

खोके कोणाकडे किती पोहोचले यावरून 2-3 आमदारांमध्ये आता भांडण सुरू झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 40 गद्दार गेले मात्र नवे सहकारी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे समाधान वाटत असून, त्यांना घेऊन आम्ही पुढे जात असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली. यावरून आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : दादांसारखा नेता मुख्यमंत्रीपदी असावा; आमदार रोहित पवारांचं मोठं विधान

आदित्य ठाकरे यांना आमच्यावर टीका करण्याशिवाय कोणतं काम उरलेलं नाही. आम्ही घोषणा करत नाही तर त्या कृतीमध्ये आणतो. त्या निर्णयाची अंमलबजावणी करतो. आदित्य ठाकरे यांनी फिल्डवर जाऊन पाहणी करावी. सामान्य शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांची चौकशी करावी. आम्ही दिवाळी असताना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहोत. निकषात नसताना देखील शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय., असं शंभूराज देसाई म्हणाले.

दरम्यान, तुम्हाला जर मळमळत असेल तर यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे डॉक्टर शिंदे साहेब. डॉक्टर शिंदे यांच्या औषधानं तुम्ही बरे व्हालं, असा टोला शंभूराज देसाईंनी यावेळी आदित्य ठाकरेंना लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाची ‘तब्बल’ इतकी लाख प्रतिज्ञापत्रं रद्द?”

“राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘हा’ मोठा नेता पवारांच्या उपस्थितीत हाती बांधणार घड्याळ”

शिंदे गट-मनसे-भाजप महायुती होणार का?; मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले…