Home महाराष्ट्र “ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाची ‘तब्बल’ इतकी लाख प्रतिज्ञापत्रं रद्द?”

“ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाची ‘तब्बल’ इतकी लाख प्रतिज्ञापत्रं रद्द?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना कुणाची?, शिंदेंची की ठाकरेंची?, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे समोरासमोर आहेत. अशातच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे.

त्यानंतर दोन्ही गटाला वेगवेगळी चिन्ह व नावं देण्यात आली आहेत. यानंत आता दोन्ही गटाकडून शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह परत मिळवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर केले जात आहेत. अशातच ठाकरे गटाकडून काही दिवसांपूर्वी दोन ट्रक भरून तब्बल 11 लाख प्रतिज्ञापत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली होती.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘हा’ मोठा नेता पवारांच्या उपस्थितीत हाती बांधणार घड्याळ”

दरम्यान, मात्र यातील तब्बल 2.5 लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने रद्द केली आहेत. ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती प्रतिज्ञापत्रे चुकीची असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच निवडणूक आयोगाने जो काही मजकूर ठरवून दिला होता त्या प्रमाणे प्रतिज्ञापत्रे सादर न केल्याने ही प्रतिज्ञापत्रे रद्द करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गट-मनसे-भाजप महायुती होणार का?; मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले…

…तेंव्हा तुम्ही काय करत होता?; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना सवाल

आम्ही भोंग्याचा आवाज सहन करतोय ना, मग तुम्हीही…; ‘त्या’ ट्विटवर मनसे नेत्याचा धमकीवजा इशारा