Home अहमदनगर …तेंव्हा तुम्ही काय करत होता?; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना सवाल

…तेंव्हा तुम्ही काय करत होता?; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 964 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

गेल्या 10 वर्षात भू-विकास बँकेने एका शेतकऱ्याला तरी कर्ज दिलं का? भू-विकास बँक अस्तित्वात तरी आहे का? 25 ते 30 वर्षापासून बँकेनं कर्ज वसुली केली नाही. राहिलेलं कर्ज वसूल होणार नाही, हे कळल्यावर सरकारने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला, अशी टीका पवारांनी केली होती. यावर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : आम्ही भोंग्याचा आवाज सहन करतोय ना, मग तुम्हीही…; ‘त्या’ ट्विटवर मनसे नेत्याचा धमकीवजा इशारा

विकास बँकेचा बोझा अद्यापही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर आहे. आता ते शंभर टक्के माफ झाले असून लोक त्यातून मोकळे झाले आहेत. शेतकरी कायमच परावलंबी राहिल्याशिवाय नेत्याचे महत्त्व वाढत नाही असं राजकारण अनेक वर्षापासून त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे, अशी अप्रत्यक्ष टीका विखे पाटलांनी यावेळी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

सरकार शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी एक एक पाऊल टाकत आहे. त्याच त्यांना दुःख होत आहे. त्या रकमा जुन्या होत्या, मग तुमच्या काळात का नाही माफ केल्या? सरकार तुमचं होतं तेव्हा तुम्ही काय करत होता? तसेच त्यांनी विधान करताना पूर्ण माहिती घेणे आवश्यक होतं, असा अप्रत्यक्ष टोलाही विखे पाटलांनी यावेळी पवारांना लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मनसेसोबत युती करायची असेल, तर…”

आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल; मनसेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

अजून पंधरा वर्षे राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येणार नाही; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य