Home महाराष्ट्र अजून पंधरा वर्षे राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येणार नाही; शिंदे गटातील नेत्याचं मोठं...

अजून पंधरा वर्षे राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येणार नाही; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज्यात सुरु असलेलं राजकारण हे लोकशाहीला घातक आहे. यातून लोकशाही टिकणार नाही. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पर्याय म्हणून समोर आलं पाहिजे. तरच लोकशाही टिकेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निबांळकर यांनी म्हटलं होतं. याला राज्याचे उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : ते मैदानात जिंकले, अन् तुम्ही मात्र…; ठाकरे गटातील खासदाराचा शिंदेंना टोला

राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आलं की लोकशाही टिकते. त्यांनी सत्तेतून पायउतार झालं की, लोकशाहीला धोका निर्माण होतो. मात्र, लोकशाही मार्गानेच विधानसभेत बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन झालं. लोकशाहीतूनच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली, असं शंभूराज देसाई म्हणाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शंभूराज देसाई बोलत होते.

बहुमताचा आदर केला पाहिजे, त्यालाच महत्व आहे. रामराजेंचा पक्ष आता सत्तेत नाही, ही त्यांची खंत आहे. राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे सत्तेविना ते तळमळत आहेत. पण, त्यांना अडीच नाहीतर पुढील दहा-पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत राहावं लागणार आहे,” असंही शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अभिनेत्री प्राजक्ता माळी, शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या घरी; मनसेत प्रवेश करणार?; राजकीय चर्चांना उधाण

मनसे-भाजप महायुती होणार की नाही? गुलाबराव पाटील, म्हणाले…

मोठी बातमी! रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांची पोलिसात तक्रार, म्हणाले, राणा यांनी…