राज्यपालांना विमान नाकारणं हा दुर्दैवी प्रकार; ठाकरे सरकार इगो असलेलं सरकार- देवेंद्र फडणवीस

0
291

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचं समोर आलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज्यपालांना विमान नाकारणं हा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मालकीची ही मालमत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिलं होतं. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचलं होतं पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं., असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

महत्वाच्या घडामोडी 

राज्यपालांच्या विमान प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरत राज्यपाल थेट राजभवनात

“कुख्यात गुंड अरूण गवळी कोरोना पाॅझिटिव्ह”

“धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप”

भाजपा नेते किरीट सोमय्यांना अलिबाग पोलिसांनी घेतलं ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here