Home नाशिक सरकार मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं; औरंगाबाद नामांतरावर संजय राऊतांचं भाष्य

सरकार मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं; औरंगाबाद नामांतरावर संजय राऊतांचं भाष्य

नाशिक : मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अनेकदा औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं चालतं आणि सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का? असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचं नाव सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर वापरणं हा गुन्हा आहे असं मला असं वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालतं, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“संभाजी महाराज माफ करा आम्हांला, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबाबोंब; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

नाशिकमध्ये भाजपला धक्का; 2 मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”