Home महाराष्ट्र ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबाबोंब; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबाबोंब; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरोना लस मोफत द्यावी, अशी मागणी केली. यावर राज्य सरकारने केंद्र सरकार राज्याला निधी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, लसी संदर्भात सर्व प्रोटोकॉल केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ठरवले आहेत. पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे. आमची अपेक्षा अशी आहे की अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

नाशिकमध्ये भाजपला धक्का; 2 मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

तुम्ही मर्द असाल तर…; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली- अतुल भातखळकर