ईडीचे ऑफिस आता मोदींच्या घरातून चालतं; बच्चू कडूंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

0
273

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

ईडीचे ऑफिस आता मोदींच्या घरून चालतं आहे. ते पंतप्रधान कार्यालयातून चालत नाही असं दिसतं. गैरफायदा घेणारं हे पहिलं सरकार आहे. हातातल्या बाहुलीप्रमाणे इडीला नाचवलं जात आहे., असं म्हणत बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ईडीच्या प्रमुखांना काही इमानी इभ्रत काही जिवंत असेल आणि भारताचे नागरिक असाल तर त्यांनी सांगा की, ते मोदीचे गुलाम आहेत की भारतीय घटनेचे अधिकारी आहेत? एका तरी भाजपच्या नेत्यावर, आमदारांवर चौकशी झाली असेल असे एखादे उदाहरण सापडलं नाही. हे सर्व गंगास्नान करून आलेत का? असा सवाल करत बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सीरम इन्स्टीट्यूटच्या सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या; मनसेची मागणी

एक नोटीस आली अन् पक्ष हादरला…; राम कदमांची टीका

“एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण?”

“17 व्या वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण, आता भाजपमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here